‘त्या’ प्रकरणी स्मृती इराणींवर पुण्यात फौजदारी खटला दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप नेत्या व माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याविरोधात पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात फसवणूक केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यंनी याप्रकऱणी खटला दाखल केला आहे.

स्मृती इराणी यांनी २०१४ व २०११ च्या लोकसभा निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा ठपका रुपाली पाटील यांनी ठेवला आहे. त्यांनी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. गायकवाड यांच्या न्यायालयात मंगळवारी खटला दाखल केला आहे. हा फौजदारी खटला अड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आला असून लवकरच न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे.

अशाच प्रकारे स्मृती इराणींच्या प्रतिज्ञापत्रावरून सध्या मुद्दा जोरदार गाजत आहे. त्यांच्याविरोधात यापुर्वी लखनऊ कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तौहीद सिद्दीकी यांनी तक्रार दाखल केली आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

त्यात त्यांनी १९९४ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेतल्याचे म्हटले होते. परंतु यंदा दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपण पदवी घेतली नसल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती वाद सुरु आहे. परंतु आता पुण्यात फौजदारी खटला दाखल झाल्याने न्यायालयात यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Loading...
You might also like