#Loksabha : सहाव्या टप्प्यात देशामध्ये ६१.१४ टक्के मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदारांनी मतदान केले. निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात एकूण ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे.

दरम्यान, या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपाने मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. याशिवाय दिल्लीतील सर्व सात जागांसाठी आज मतदान झाले.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ८०.१६ टक्के, दिल्लीत ५६.११ टक्के, हरयाणात ६२.९१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५३.३७ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.४६ टक्के, तर मध्य प्रदेशमध्ये ६०.४० टक्के मतदान झाले.