‘एमपी’च्या ग्वालियरमध्ये ‘पुणेरी पॅटर्न’ ! ‘डोरबैल खराब है, कृपया दरवाजा खुलवाने केल लिये मोदी-मोदी चिल्‍लायें’

ग्वालियर : वृत्‍तसंस्था – लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय नेते आणि उमेदवार लोकांपर्यंत पोहचण्याची एकही संधी सोडत नाहीत. पुणे शहरात जोगोजागी ‘पुणेरी पाटी’ पहावयास मिळते. एवढेच नव्हे तर पुणेरी पाटीवर ‘प्रबोधनात्मक’ संदेश देखील लिहीलेला दिसतो. अशाच प्रकारचे काहीसे चित्र सध्या मध्यप्रदेशातील ग्वालियर शहराजवळ पहावयास मिळात आहे.

ग्वालियरच्या जवळ असलेल्या एका शहरात भाजपाच्या समर्थकांकडून पुणेरी पध्दतीने हटके प्रचार करण्यात येत आहे. मुरैना जिल्हयामधील गावांमध्ये अनेकांच्या घराबाहेरील एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ते पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाच्या समर्थकांनी हे पोस्टर आप-आपल्या घराबाहेर लावले आहे.

मुरैना जिल्हयातील रामनगर परिसरातील भाजपाच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ ही पोस्टर्स घराबाहेर लावली आहेत. जागोजागी घराबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ‘डोरबैल खराब है, कृपया दरवाजा खुलवाने केल लिये मोदी-मोदी चिल्‍लायें’ असा हिंदीमधुन मजकुर लिहीण्यात आला आहे. असेच एक पोस्टर जी. शर्मा यांच्या घराबाहेर लावण्यात आले आहे. त्याबाबत शर्मा म्हणाले की, आमच्या घराची डोअर बेल बिघडली होती. त्यानंतर काहीतरी करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता.

सध्या निवडणुकीचे वातवावरण सर्वत्र आहे. त्यामुळे मी हे पोस्टर घराबाहेर लावले आहे. शर्मा यांच्या घराबाहेरील पोस्टर पाहुन मोदींच्या चाहत्यांनी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आप-आपल्या घराबाहेर अशी पोस्टर्स लावली आहेत. त्यामुळेच सध्या ‘पुणेरी पॅटर्न’ एमपीच्या ग्वालियर आणि परिसरात दिसत आहे.