देशात भाजप आघाडीवर तर काँग्रेस पिछाडीवर ; भाजप ३३५, काँग्रेस १०३ तर इतर पक्ष १०० जागांवर आघाडीवर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून देशातील जनतेने कोणाला कौल दिला याचे चित्र स्पष्ट होत आहे. आज मतमोजानोला सुरवात झाल्यापासूनच देशात भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेस पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत हाती आलेल्या निकालानुसार भाजप ३३५ तर काँग्रेस १०३ जागावर आघाडीवर आहे. देशातील प्रादेशिक पक्षांचे देखील निर्णायक निकाल हाती येत असून ते ही १०४ जागांवर आघाडी आहेत.

देशातील ‘या’ महत्वाच्या मतदार संघातील परिस्थिती जाणून घ्या
१ . वाराणसी : नरेंद्र मोदी आघाडीवर
२ . अमेठी : राहुल गांधी पिछाडीवर
३. रायबरेली : सोनिया गांधी आघडीवर
३ . वायनाड : राहुल गांधी आघाडीवर
४. गांधीनगर : अमित शाह आघाडीवर
५. फत्तेपूर : राज बब्बर पिछाडीवर
६. पिलभीत : वरून गांधी पिछाडीवर
७. आझमगड : अखिलेश यादव आघाडीवर
८. हैद्राबाद : असदुद्दीन ओवैसी पिछाडीवर
९. भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंग आघाडीवर
१०. मधेपुर : शरद यादव पिछाडीवर