राजस्थानमधील कोटामध्ये ओम बिर्ला यांचा विजय, मीरांचा पराभव

कोटा : पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघात अतिशय रंगतदार लढत झाली. या मतदारसंघात भाजपचे ओम बिर्ला आणि कॉग्रेसचे रामनारायन मीरा यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे ओम बिर्ला हे विजयी झाले तर काँग्रेसचे रामनारायन मीरा यांचा पराभव झाला. राजस्थानमधील कोटाच्या या लढतीकडेही सर्वांची नजर लागली होती.

कोटा लोकसभा मतदारसंघात अत्यंत तुल्यबळ लढत झाली. या मतदार संघात भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे रामनारायन मीरा यांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्टेची केली होती. काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविली होती.परंतु कोटाच्या जनतेनं काँग्रेसला कौल न देता भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे भाजपचे ओम बिर्ला विजयी झाले असून काँग्रेसचे रामनारायन मीरा यांचा पराभव झाला आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत हाती आलेली आकडेवारी अशी आहे.

उमेदवार पक्ष मिळालेली मतं
ओम बिर्ला भाजप ७,९६,०७१
रामनारायन मीरा कॉंग्रेस ५,१७,५५९