भाजपचे ‘प्रदेशाध्यक्ष’ आघाडीवर तर कॉंग्रेसचे ‘प्रदेशाध्यक्ष’ पिछाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना युतीने मुसंडी मारलेली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पिछाडीवर आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या २१ हजार मतांन पिछाडीवर आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत. जालना आणि नांदेड़ येथील निवडणूकीवर संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी यापुर्वी आपला गड सातत्याने राखला आहे. परंतु मोदी लाटेत कॉंग्रेसला २ जागा राखण्यात य़श आले होते. त्यात नांदेड़च्या जागेचा समावेश होता. अशोक चव्हाणांना त्यावेळी आपला गड राखता आला होता. त्यानंतर आता त्यांना यावेळी आपली जागा राखता येईल का याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या ४६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.