लातूरमध्ये भाजपचीच सरशी ; काॅंग्रेस कोमात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन –लातूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत झाली. त्यात भाजपचे सुधाकर श्रृंगारे हे विजयाच्या वाटेवर आहेत. तर कॉंग्रेसचे मच्छिंद्र कामत हे पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याचे चित्र आहे. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपने मोदी लाटेत विजय मिळविला होता. परंतु यावेळी लातूरमध्ये विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

२०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपकडून सुनील गायकवाड यांनी बाजी मारली होती. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारत भाजपने सुधाकर श्रृंगारे यांना संधी दिली. तर कॉंग्रेसकडून कित्येक दिवस उमेदवारच ठरत नव्हता. शेवटी क़ॉंग्रेसने उद्योजक असलेल्या मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली. बेरोजगारी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्नांवर कॉंग्रेसचा भर होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमीत देशमुख यांनी कामत यांच्या बाजूने तर कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी श्रृंगारे यांच्या बाजूने स्थानिक पातळीवर आपली उर्जा लावली. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची औसा येथे झालेली सभादेखील महत्त्वाची ठरली. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काही प्रमाणात आव्हान देण्यात आले. परंतु कॉंंग्रेस आणि भाजपची स्थानिक ताकद आणि संघटन मजबूत असल्याने खरी लढत या दोन पक्षांतच झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like