पंजाबमध्ये काँग्रेसची आघाडी, अकाली-भाजप पिछाडीवर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून देशातील पंजाब राज्यातीलही मतदानाचा कौल स्पष्ट होत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहेत तर अकाली – भाजप गटबंधन २ जागांवर आघाडीवर आहेत. ‘आप ‘ही या ठिकाणी १ जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये एका टप्यातच मतदान झाले होते. या ठिकाणी लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. पंजाब राज्यात काँग्रेसचा दबदबा पाहण्यास मिळत आहे.

पंजाब राज्याच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले असून या ठिकाणीही महत्वाच्या लढती होत आहेत. अमृतसरमधून काँग्रेसचे गुरुजित सिंग औजाला २६१० मतांनी आघाडीवर आहेत तर राज्यमंत्री हरदीप पुरी पिछाडीवर आहेत. सनी देओलने २७ ४५३ मते मिळवली आहेत तर काँग्रेसचे सुनील जाखड यांनी १६९५१ मते मिळवली आहेत. फतेहगड साहिब या मतदार संघात काँग्रेसचे डॉ. अमर सिंग आघाडीवर आहेत. बठिंडा लोकसभा मतदारसंघात हरसिमरत कौर बादल पिछाडीवर आहेत.