सोलापूर मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मारली बाजी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या प्रस्थापित राजकारणाला आव्हान देत वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यासोबत सोलापूरमधून आपली उमेदवारी दाखल केली होती. येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार सिध्देश्वर स्वामी यांच्यातील तिरंगी लढतीत स्वामींनी विजय मिळवला. तर प्रतिष्ठेच्या या लढतीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सोलापूरची लढत ही अतिशय प्रतिष्ठेची झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात वंचित वहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दंड थोपटले. तर भाजपने जय सिध्देश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकर यांनी मतदानादिवशी मतदारसंघातील बुथवर जाऊन पाहणी केली होती. गेल्या निवडणूकीत पराभूत झालेले सुशीलकुमार शिंदे यांना यंदा वंचित बहुजन आघाडीमुळे प्रचंड तगडे आव्हान निर्माण केले. मात्र याठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनाही विजयापासून वंचित राहावे लागले तर सुशील कुमार शिंदे यांची मतं त्यांनी खाल्ली असल्याचे चित्र आहे.

विजयी उमेदवार –  डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी

पराभूत – शिंदे सुशीलकुमार संभाजीराव, आंबेडकर प्रकाश यशवंतराव

एकूण उमेदवार – १३

उमेदवार

६ वाजून ५० मिनिटांची आकडेवारी

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी (भाजप) – ५१५६२५

शिंदे सुशीलकुमार संभाजीराव (काँग्रेस) – ३६०७३८

आंबेडकर प्रकाश यशवंतराव (वंचित बहुजन आघाडी) – १६७६२१

सोलापूरधील एकूण मतदार – १८ लाख ५० हजार ००२

पुरुष मतदार – ९ लाख ६३ हजार ३८४

महिला मतदार – ८ लाख ८६ हजार ५६४

सोलापूर मतदारसंघामध्ये झालेले मतदान – १० लाख ८१ हजार ३८६