Loksabha Result 2019 : हरियाणामध्ये मोदींची ‘जादू’ ; काँग्रेसची ‘गोची’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणा राज्यातील १० लोकसभा मतदार संघातील मतमोजणीचे निकाल हाती येत असून या ठिकाणी मोदींची जादू चालली आहे. राज्यात भाजप ९ लोकसभा मतदार संघात आघाडीवर असून या ठिकाणी काँग्रेसची मात्र गोची झालेली दिसून येत आहे. काँग्रेस फक्त १ जागावर आघाडीवर दिसून येत आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी तगडी लढत पाहायला मिळत आहे.

हरियाणात काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा आणि भाजपचे अरविंद शर्मा यांच्यात कांटे की टक्कर होत आहे. राज्यात भाजपचे संजय भाटिया सर्वाधिक मतांनी आघाडीवर आहेत. हरियाणातील हॉट सीट हिसार मधून भाजपचे बृजेंद्र सिंग जेजेपीकेच्या दुष्यन्त चौटालाहून १३००० मतांनी आघाडीवर आहेत. हरियाणामध्ये काॅंग्रेस आणि आईएनएलडीचा पराभव दिसून येत आहे. हरियाणामध्ये सहाव्या टप्यात १२ मे ला मतदान झाले होते. या ठिकाणी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १० पैकी ७ जागांवर विजय मिळविला होता.