home page top 1

भाजपच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशभरात भाजपला मिळत असलेल्या प्रचंड यशानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ अशाप्रकारची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सबका साथ, सबका विकास हा भारतीय जनता पक्षाने दिलेला नारा आहे. त्या नाऱ्याच्या बेरजेसोबत सबका विश्वास जोडत त्यातून विजयी भारत असा निष्कर्ष मोदींनी काढला आहे. आम्ही केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे, असे नरेंद्र मोदींना सांगायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. अमित शहा म्हणाले आहेत की, हा परिणाम म्हणजे विरोधी पक्षांनी केलेल्या दुष्टप्रचार, असत्य, व्यक्तिगत आरोप आणि तथ्यहीन राजकारणाच्या विऱोधात भारताच्या जनतेला दिलेला संदेश आहे. भारताच्या जनतेने जातीवाद, परिवारवाद आणि तुष्टीकरण यांना उखडून टाकून विकास आणि राष्ट्रवादाला पसंती दिली आहे.

दरम्यान, एक्झिट पोलमधून व्यक्त केलेले अंदाज खरे होताना दिसत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारी निकालाच्या एक दिवस आधीच केली होती.

Loading...
You might also like