अमरावतीत चुरशीच्या लढतीत नवनीत राणा ६,३७७ मतांनी आघाडीवर

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे, युवा स्वाभिमानी आघाडीकडून नवनीत कौर राणा निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा ६३७७ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदार संघात १८ लाख ३० हजार ५६१ मतदार आहेत. त्यापैकी ११,०४,९३६ मतदारांनी मतदान केले होते.

या मतदार संघात सकाळची ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. सध्या(दुपारी ०१:११वाजता ) प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा ६३७७ मतांनी आघाडीवर आहेत.

लोकसभेतील शिवसेनेचे गटनेता आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना यापूर्वीच्या निवडणुकीत तगडे आव्हान दिले होते. ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी लाभलेला अन् अनुसूचित प्रवर्गांसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा देशभरातील चर्चित मतदारसंघांपैकी एक शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील, केरळ, बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल. हा मतदारसंघ अडसुळांचा असला तरी अडसूळ मात्र अमरावतीचे नाहीत. सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात अडसूळ हे बुलडाणा मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात पोहोचले. तत्पूर्वी ते बुलडाण्याचे खासदार होते. राखीव आणि सुरक्षित मतदारसंघ हे अडसूळ यांच्या राजकारणातील अग्रणी सूत्र होते.

टीप : हा अंतीम निकाल नाही.