जावई हरल्याच दुखः नाही, पण… : रावसाहेब दानवे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशासह महाराष्ट्रात देखील मुसंडी मारत मोठ्या प्रमाणात यश मिळवले. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने तब्बल ३५० जागा जिंकत दणदणीत यश मिळवले. भाजप बरोबर राज्यात शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवताना १८ जागा जिंकल्या. मात्र या जागांवर यश मिळवताना शिवसेनेने महत्वाच्या आणि खूप वर्षांपासून वर्चस्व आलेल्या जागा मात्र गमावल्या. यात औरंगाबाद, शिरूर, रायगड, अमरावती या जागांचा समावेश होता. यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी धक्कादायकरीत्या पराभव केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतविभाजन झाली आणि याचा फायदा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना झाल्याचा आरोप खैरे यांनी केला. तसेच खैरेंनी आपल्या पराभवाला खुद्द रावसाहेब दानवेंना जबाबदार धरत दानवे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले कि, मला जावई हरल्याच अजिबात दुखः नाही तर चंद्रकांत खैरे पडल्याचे दुखः झाले आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना ते म्हणाले कि,पराभवच खापर कोणावर फोडायचं म्हणून माझ्यावर फोडलं जात असून दानवे आपला मित्र आहे म्हणून सहज समजून घेईल म्हणून माझ्यावर आरोप केले जात असल्याचे दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना दानवे म्हणाले कि, विधानसभेची तयारी आम्ही आतापासूनच सुरु करणार असुन विधानसभेला देखील आम्ही विजयी होणार असून काँग्रेसला उमेदवार मिळणार नाहीत.