सिंधूदुर्गात शिवसेनेचा उमेदवार ठरला ; दीपक केसकरांनी केले स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. तेथील सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे, असं स्पष्टीकरण पालकमंत्री दीपक केसकर यांनी दिलं आहे. त्यामुळे युती झाली तरीही ही जागा भाजपकडे जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी स्वबळावरच लढावे लागणार आहे, हेही चित्र स्पष्ट झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपमध्ये युतीवरून अद्यापही संभ्रमतेचे वातावरण आहे. तसंच राजकारणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग नेहमीच केंद्रबिंदु ठरले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जोरावर नारायण राणेंनी लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यावरून शिवसेना- भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, २०१९च्या मताधिक्याच्या गणितात सुरेश प्रभू यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, मतदारसंघात त्या जागी नारायण राणेंना साथ देऊन शिवसेनेवर मात करण्याची तयारी भाजप करत असल्याची चर्चाही सुरु होती.