Lonand Crime | धक्कादायक ! चक्क उद्घाटनादिवशीच ज्वेलरी शाॅपमध्ये चोरी, पुण्यातील महिलेसह दोघे ताब्यात

लोणंद : पोलीसनामा ऑनलाइन – Lonand Crime | अनेक अशा दुकानात चोरी झालेल्या घटना समोर येत असतात. मात्र, लोणंद (Lonand Crime) येथील ज्वेलरी दुकानात चक्क शाॅपच्या उद्घाटना दिवशीच चोरी झाल्याची घटना घडली. येथील लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी दुकानात (Jewelery Shop) उद्घाटनाच्या दिवशीच डल्ला मारला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना लोणंद पोलिसांनी (Lonand police) अटक केले आहे.

ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय 29, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) आणि नीलेश मोहन घुते (वय 34, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे) अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या संशितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, ही घटना घडल्यावर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी तपास सुरु केला. शहरातील तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये हे चोरटे पुणे येथील सराईत चोरटे असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार ज्योत्स्ना कछवाय (Jyotsna Kachvay) आणि नीलेश घुते (Nilesh Ghute) यांना अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने, तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे.

दरम्यान, ही कारवाई लोणंदचे (Lonand Crime) एपीआय विशाल वायकर (API Vishal Waiker),
पोलीस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane), पोलीस हवालदार स्वाती पवार, संतोष नाळे,
श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, फय्याज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार, केतन लाळगे, वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी केली आहे.

Web Titel :- Lonand Crime | Shocking! Theft in a jewelery shop on the very opening day, both in custody with a woman from Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार नवा महामार्ग

Gold Silver Price Today | खूशखबर ! सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीची किंमत सर्वात कमी, जाणून घ्या

Pune Crime | ओळख कशाला करुन देतो, असे म्हटल्याने टोळक्याने मारहाण करुन केली तोडफोड; वारजे माळवाडीमधील घटना