Lonand Railway Accident | दुर्देवी ! रेल्वेच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू

लोणंद : पोलीसनामा ऑनलाइन Lonand Railway accident | लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत बापलेकाचा मृत्यु (Lonand Railway Accident) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. बंगळुरू- जोधपूर एक्‍सप्रेस (bengaluru jodhpur express) रेल्वे गाडी नंबर 06506 या रेल्वेच्या धडकेमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना रविवारी (26 सप्टेंबर) रोजी घडली आहे.

या घटनेत खंडाळा तालुक्यातील अंदोरी (Andori) येथील SRPF मध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (Shailesh Dnyaneshwar Bodke) (वय 28) आणि त्याचा 1 वर्षाचा मुलगा रुद्र बोडके (Rudra Bodke) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अंदोरी येथील शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. बोडके सुट्टी घेऊन 2 दिवसांपूर्वीच अंदोरी येथे घरी आले होते.

दरम्यान, शैलेश बोडके त्यांच्या रुद्र या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर (Lonand Railway Accident) गेले असता बंगळुरु-जोधपूर एक्‍सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. पाटोळे, (API V. R. Patole) आदीनाथ भोसले (Adinath Bhosale) व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

 

Web Title : Lonand Railway Accident | Unfortunate! Baap-leka killed in train collision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या

Stock Market | दहा वर्षात 24 रुपयांवरून 2100 रुपयावर पोहचला पाईप बनवणार्‍या कंपनीचा शेयर, एक लाखाचे केले 90 लाख; जाणून घ्या

Pune Police | गुन्हे शाखेचा शहरात रिक्षाचालकांविरोधात ‘ड्राईव्ह’, अनेक रिक्षाचालकांवर कारवाई

Online Rummy | हायकोर्टचा मोठा निर्णय; म्हणाले – ‘ऑनलाइन रमी एक कौशल्यपूर्ण खेळ, यावर बंदी घालणे असंवैधानिक’

Sultan Died | 21 कोटींची बोली लागलेल्या धडधाकट ‘सुल्तान’चे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन; मालक बेनीवालांचा दावा

Rajya Sabha By-election | भाजपचा मोठा निर्णय ! काँग्रेसच्या विनंतीला मान देत भाजपची ‘या’ निवडणूकीतून माघार