Lonavala Crime | लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावरील दरोड्यातील मुख्य आरोपीला MP तून अटक, 30.5 लाखाचा मुद्देमाल जप्त; आतापर्यंत 15 जणांना अटक

लोणावळा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  लोणावळ्यातील (Lonavala Crime) प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (Dr. Hiralal Khandelwal) यांच्या प्रधानपार्क मधील बंगल्यावर 15 जून रोजी मध्यरात्री एक ते अडीच दरम्यान दरोडेखोरांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून 67 लाखांचा ऐवज लंपास केला होता. लोणावळ्यात घडलेल्या (Lonavala Crime) या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेमंत रंगराज कुसवाह (वय-24 रा. डाबरी, ता. राहतगड जि. सागर मध्यप्रदेश), बथु साधु विश्वासराव (देशमुख) (वय-52 रा. औंढोली, ता. मावळ), सुनिल शंकर शेजवळ (वय-40 रा. देवकीनंद चाळ, घाटकोपर वेस्ट, मुळ रा. लाखनगाव ता. आंबेगाव पुणे), रविंद्र काशीराम पवार (वय-42 रा. संभाजीनगर, अंधेरी वेस्ट, मुंबई), शामसुंदर शिवनाथ शर्मा (वय-43 रा. आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव पुर्व, मुंबई), मुकेश रमेश राठोड (वय-45 रा. भटवाडी, घाटकोपर वेस्ट, मुंबई), सागर रमेश धोत्रे (वय-25 रा. शंकर मठ, हडपसर, पुणे), प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुसवाह उर्फ पटेल (वय-27 रा. डाबरी, मध्यप्रदेश),

 

Lonavala Crime | pune rural police arrested criminal for robbery of Khandelwal's bungalow from MP, Rs 30.5 lakh confiscated; So far 15 people have been arrested

दिनेश जयराम अहिरे (वय-38 रा. कमला तिवारी चाळ, घाटकोपर पश्चिम, मुंबई), विकास शंकर गुरव(वय-34 रा. सांताक्रुज पुर्व, वाकोला, मुंबई), संजय भगवान शेंडगे (वय-47 रा. भटवाडी, घाटकोपर पुर्व, मुंबई), दौलत भावसिंग पटेल (वय-24 रा. डाबरी, मध्यप्रदेश), विजय चंद्रप्रकाश पटेल (वय-21 रा. वल्लभनगर, जि. सागर, मध्यप्रदेश), गोविंद यानसिंग कुशवाह (वय-18 रा. डाबरी, मध्यप्रदेश) प्रदिप लल्लु धानुक (वय-28 रा. डाबरी, पो. चंद्रापुर ता. रहातगड, जि. सागर, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी हेमंत रंगराज कुसावह हा मुख्य आरोपी आहे.
याच्यावर गोवा (Goa), मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यात घरफोडी, चोरीचे 4 गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या (Lonavla City Police Station) पोलिसांकडे स्वाधिन करण्यात आले आहे.

पुणे, मुंबईतून 8 आरोपींना अटक

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे लोणावळा, मुंबई, सांताक्रुज, हडपसर, अंधेरी, मलाड येथून 8 आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशात असून त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली.

 

मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मध्य प्रदेशात तीन आठवडे मुक्काम करुन आरोपींचा शोध घेतला.
पथकाने मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गंज बासौदा, राहतगड, सागर, डांबरी या भागात आरोपींचा शोध घेऊन 5 मुख्य आरोपींना अटक केली.
तसेच 2 विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

30.5 लाखांचा ऐवज जप्त

गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 30 लाख 52 हजार 200 इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम 6 लाख 26 हजार, 23 लाख 68 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यातील पैशातून विकत घेतलेले 57 हजार 500 रुपये किमतीचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

 

यांनी केली ही कारवाई

ही कारवाई कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police Manoj Lohia), पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील (Additional Superintendent of Police Vivek Patil), उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग नवनीत कावत (Sub-Divisional Police Officer Navneet Kavat) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat).

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार (Police Inspector Dilip Pawar) यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे,
पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, शब्बीर पठाण,
पोलीस हवालदार महेश गायकवाड, सचिन गायकवाड, निलेश कदम, प्रकाश वाघमारे,
मुकुंद अयचित, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, प्रमोद नवले,
मुकेश कदम, अक्षय जावळे, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, विद्याधर निचीत, दत्तात्रय तांबे, मो. अंजन मोमीन,
सुभाष राऊत, गुरुनाथ गायकवाड, जनार्धन शेळके, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हनुमंत पासलकर,
विक्रमसिंह तापकिर, सुर्यकांत वाणी, चंद्रकांत जाधव,अमोल शेडगे, काशिनाथ राजपुरे,
समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारताचे स्वत:चे Sandes अ‍ॅप, जाणून घ्या कसे करते काम

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

Pune Crime | रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणार्‍यास सक्तमजुरीची शिक्षा; चोरीच्या 11 गुन्ह्यात झाला कारावास