Lonavala dam | धरणाची पातळी वाढली; इंद्रायणी काठच्या गावांना Alert

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Lonavla Dam । गेल्या काही दिवसापासून सर्वत्र जोरदार पावसानं धुडगूस घातला आहे. पुणे जिल्ह्यासह इतर जिल्हे देखील जलमय झाले आहेत. तर, लोणावळा खंडाळा व परिसरात तर ढगफुटी सदृश परिस्थिती होती. ची (Lonavala Dam) पाणी पातळी काल (बुधवारी) सायंकाळच्या दरम्यान 623.88 मीटर होती. तर पाणीसाठा 8.858 दशलक्ष घनमीटर अर्थात 58.74 टक्के होता. धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्याचा कल मागील दोन दिवसांपासून अधिक असून काल (बुधवारी) फक्त 8 तासांतच लोणावळा धरणावर 114 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

लोणावळा (Lonavla) येथे आगामी दोन ते तीन दिवस अतिवृष्टी पर्जन्याचा कल हवामान विभागाकडून वर्तवला गेला आहे. तसेच, टाटा कंपनीकडून अधिक क्षमतेने अर्थात 800-850 क्यूसेस पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येते. धरणातील (Dam) सध्याची सरासरी आवक 1600-1700 क्यूसेस दराने येत आहे. म्हणून धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत असून जवळपास ही स्थिती अशीच राहिली तरी लोणावळा धरण पूर्ण भरण्याची शक्यता झाली आहे. तसेच, द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित पाण्याचा प्रवाह जाण्याची शक्यता आहे. यावरून आता धरणाच्या खालील बाजूस असलेली शेती पम्प, अवजारे, जनावरे, अन्य तत्सम साहित्य वेळीच काढून घ्यावीत. तसेच, इंद्रायणी नदीपात्राला (Indrayani river basin) तर मध्ये उतरणे धोक्याचे आहे, असं धरण प्रमुख-टाटा पॉवर बसवराज मुन्नोळी (Basavaraj Munnoli) यांनी सांगितले आहे.

या दरम्यान, लोणावळा (Lonavla) नगरपालिकेचे तुंगार्ली, लोणावळा तलाव, टाटांच्या वळवण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं जलमय करून टाकलं आहे. या अतिमुसळधार पावसाने काल सायंकाळी पाचपर्यंत देशात 140 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाची नोंद झाली. लोणावळा परिसरात हंगामात आतापर्यंत एकूण दोन हजार 67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title :- Lonavala Dam | alert to indrayani river side village

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी