लोणावळ्यात बंगल्यात जुगार अड्डा ; पोलिसांचा छापा ३० जण ताब्यात

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळ्यातील एका बंगल्यामध्ये छापा टाकून लोणावळा पोलिसांनी जुगार अड्डा उद्वस्त केला. लोणावळा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री घातलेल्या छाप्यात ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर ३० जणांना ताब्यात घेतले आहे. यातील २५ जण गुजरातचे आहेत. तर ४ जण राजस्थानचे आहेत.

भुषण कांतीलाल भुरट (लोणावळा), दिनेश कांतीलाल शाह (६२), मोहम्मद याकुब युसुफ मियां शेख (४४), गवरान वासुदेव जोशी (२९), विनोदभाई उमरसीभाई नंदा (५८), राजेंद्र पुरुषोत्तम पटेल (३९), रामणिकलाला मनसुरतभाई जीवनी (६२), जितेंद्र ललीतभाई व्यास (५०), विवेक रामजीभाई काछडिया (२६), राजेश बाबूभाई परसाळा (३९), हितेंद्र सामंत चौहान (२९), सोहेल विष्णूभाई पटेल (३२), अशोक कारीदास पटेल (४६), मनोज कन्नूभाई व्यास (५४), निलेश जयंतीलाल शहा (५२), विजय विठ्ठलभाई पटेल (२८), कल्पेश मनिलाल पटेल (३६), दीपक विष्णू पटेल (३१), सिराज कामरुद्दीन टाय (३२), चिराग जगदीशभाई दवे (२७), सुरेशभाई अंबालाल पटेल (४६), अमर गुणवंतभाई आचार्य (३१), जितेंद्र गोबरभाई पटेल (३४), विष्णूभाई हरिभाई पटेल (५२), जयेश हिराभाई साकरिया (३९), प्रफुल्लभाई रामभाई पटेल (५२), मोहन लालूनाथ जोगी, मोहननाथ मेघनाथ जोगी, रमेश धनाजी पटेल, वियजयकुमार अमरजीत पाटीदार यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळ्यातील प्रीछीहिल परिसरातील एका बंगल्यात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड याना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीछीहिल भागात शोध मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर एका बंगल्यात बाहेरील बाजूला काही वाहने उभी असल्याचे दिसले. त्यानंतर तेथे मोठमोठ्या आवाजात लोक बोलत असल्याचे आढळून आले. बाहेर पोलीस असल्याची कुणकुण लागल्यावर काही जणांनी बंगल्याच्या बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तून १ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम, पाच चारचाकी गाड्या असा एकूण ३३ लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पोलीस कर्मचारी अमोल कसबेकर, जी. बी. होले, आर. के. कोळी, पी. एस. कराड, आर. बी. खैरे, आर. एफ. मदने, आय. पी. काळे, पी. आर. खुटेमाटे, जे. व्ही. दरेकर, सागर धनवे यांच्या पथकाने केली.