Lonavala Police | पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक निघाले लोणावळयाला, 3 हजार पर्यटकांना लावला 22 लाखापेक्षा जास्त दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lonavala Police | कोरोना महामारी (Corona Epidemic) चा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात विविध प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले होते. आता कोरोना संकट कमी झाल्यानंतर ते हळुहळु हटवले सुद्धा जात आहेत. परंतु याचा फायदा घेत मनाई असूनही काही लोक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. सुमारे 3 हजार पर्यटकां (Tourist) वर लोणावळा ग्रामीण पोलीसां ( Lonavla Rural Police) नी महाराष्ट्रात दंड (Fine) लावण्यात आला आहे. यामध्ये पावसाची मजा लुटण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या सुमारे 3,000 पर्यटकां(Tourist)वर 22 लाखापेक्षा जास्त रुपयांचा दंड (Fine) लोणावळा ग्रामीण पोलीसां ( Lonavla Rural Police) नी लावण्यात आला आहे.

पावसाची सुरूवात होताच मुंबई, पुणे आणि जवळपासचे पर्यटक लोणावळा, खंडाळ्याकडे निघतात.
पावसात भिजण्याची मज्जा, मक्याची गरम गरम कणसे खाणे आणि थंड-थंड हवेत गरम चहाचे घोट घेण्याचा आनंद पर्यटक घेत असतात.

मोठ्या लॉकडाऊननंतर आता आठवड्यातील पाच दिवस बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आहे.
परंतु शनिवार आणि रविवारी अजूनही लॉकडाऊन जारी आहे.
अशावेळी बाहेर पडलेल्या पर्यटकांवर मोठी कारवाईकरण्यात आली आहे.

लोणावळा, खंडाळामध्ये वाढतोय कोरोनाचा धोका

लोणावळा, खंडाळा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने पुणे जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी कलम 144 (जमाव प्रतिबंध) जारी केले आहे.

या कलमानुसार, 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. परंतु, तरीही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसत आहे.
यामध्ये विशेषता शनिवार आणि रविवारच्या दिवशी जास्त संख्या दिसून येत आहे.

आता लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याद्वारे पर्यटकांना आवाहन केले जात आहे की, पर्यटकांनी या भागात पर्यटनासाठी येऊ नये.
याशिवाय पर्यटकांना सूचना देण्यासाठी लोणावळा नगरपरिषद,
लोणावळा पोलिसांनी प्रमुख ठिकाणी नोटीस बोर्ड सुद्धा लावले आहेत.
पोलिसांनी शहरातील सर्व नाक्यांवर नाकाबंदी केली आहे.

नियम तोडणार्‍या पर्यटकांविरूद्ध कारवाईबाबत अधिक माहिती देताना लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस दिलीप पवार यांनी सांगितले की,
सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त पर्यटकांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये 22 लाखापेक्षा सुद्धा जास्तचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच 100 पेक्षा जास्त पर्यटकांविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे तुम्ही सुद्धा पावसाची मजा लुटण्यासाठी लोणावळा किंवा खंडाळ्यांला जाण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा,
कारण पोलीस तुमच्यावर सुद्धा कारवाई करू शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : lonavala police received 22 lakh fine from three thousand tourists
who reached there breaking corona restrictions

हे देखील वाचा

‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशीविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…