लोणावळ्यात तब्बल ३७५ मिमी पाऊस ! अनेक भागात पाणी शिरले, इंद्रायणी नदीला पूर

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळा शहरात या हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला असून रात्रभरात तब्बल ३०० मिमी पावसाची नगरपरिषदेकडे नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून सर्वत्र पुराचे पाणी पसरले आहे.

भुशी धरणावर जाण्यास प्रतिबंध
लोणावळ्यात पडलेल्या पावसामुळे भुशी धरणातील सांडव्यातून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर जाणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शुक्रवारी या पायऱ्यांवर ६ पर्यटक गेले होते. पाणी वाढल्याने ते अडकून पडले होते. तेथील दुकानदारांनी या ६ पर्यटकांची सुटका केली.

नांगरगाव येथील जाधव कॉलनी, विघ्नहर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. वळवळ नांगरगाव रोड, नांगरगाव ते भांगरवाडी रोडवर पाणी साचले असून अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मळवली भागातील अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणी शिरल्याने सोसायटीतील लोक आतच अडकून पडले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –