Pune : तरुणाला मारहाण करणारे 2 पोलीस तडकाफडकी निलंबित

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –   गाडीला पुढे जाण्यासाठी साईड दिली नाही म्हणून तरुणांना बेदम मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. हा प्रकार लोणावळा शहरात घडला. सोमवारी (दि.15) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एलआयसी बिल्डिंगसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रफुल्ल पांडुरुंग बोराडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादीनुसार गाडीला पुढे जाण्यास साइड न दिल्याच्या कारणावरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या जयराज देवकर आणि माणिक अहिनवे यांनी अन्य दोन व्यक्तींसह फिर्यादी प्रफुल्ल बोराडे आणि त्याच्या अन्य तीन मित्रांना शिवीगाळ करीत हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी प्रफुल्ल बोराडे यांनी तक्रार केल्यानंतर दोन्ही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांवर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे.