‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं परिसरात प्रचंड ‘खळबळ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लंडनमधील एसेक्समध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका ट्रकमधून 39 मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. याचबरोबर पोलिसांनी या ट्रकच्या ड्रायव्हरला देखील अटक केली असून त्याच्याकडे तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रायव्हर ही गाडी घेऊन बुल्गेरियावरून आला होता. शनिवारी त्याने ब्रिटनमध्ये प्रवेश केला होता. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचे वय हे 25 वर्ष असून मृतदेहांमध्ये 38 मृतदेह हे वयस्क व्यक्तींचे असून 1 अल्पवयीन आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून इतक्या मोठ्या प्रमाणात आलेले मृतदेह नेमके कुठले आहेत आणि कुणाचे आहेत.

Visit : Policenama.com