‘इंटरनेट’ स्पीड वर्ल्ड रेकॉर्ड, 1 सेकंदामध्ये Netflix वरून सर्वकाही डाउनलोड होऊ शकेल !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंटरनेट जितके वेगवान असेल तितक्याच गतीने काम देखील होते. सामान्यत: भारतात mbps ची गती मिळते. जसे की 50 mbps किंवा 100 mbps. जीबीपीएस गती असणारे इंटरनेट प्लॅन्स देखील उपलब्ध आहेत. 1024mbps म्हणजे 1gbps. त्याचप्रकारे 178Tbps ला जर Gbps मध्ये रूपांतरित केले तर ते 1 लाख 78 हजार जीबीपीएस होते.

परंतु लंडनच्या संशोधकांनी 178 Tbps चा वेग वापरला आहे. अहवालानुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) च्या संशोधकांनी एक नवीन विश्वविक्रम केला आहे. 178Tbps (178,000Gbps) ला जगातील सर्वात वेगवान इंटरनेट असल्याचे म्हटले जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी जपानच्या नावे हा विक्रम होता जेथे 172tbps वेग वापरला गेला होता. पण आता हा विक्रम युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी आपल्या नावे केला आहे.

आपण 178Tbps च्या वेगाने काय करू शकता? या वेगाचा उपयोग काय? हे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. म्हणून समजून घ्या की आपण नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व सामग्री केवळ एका सेकंदात डाउनलोड करू शकता.

हे कसे शक्य झाले ?

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल इंजिनिअरने म्हटले आहे की, ‘स्टेट ऑफ द आर्ट क्लाउड डेटा सेंटर इंटरकनेक्शन्स सध्या 35Tbps पर्यंत ट्रांसपोर्ट करू शकतात. आम्ही नवीन तंत्रज्ञानासह काम करीत आहोत जे सध्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला युटिलाइज करुन त्यास सुधारेल.’

नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चररमध्ये सामान्यत: 4.5THz चा वापर केला जातो. जरी 9THz पर्यंत उपलब्ध असले तरी ते निवडक आहे. संशोधकांनी 178Tbps ची गती साध्य करण्यासाठी 16.8THz चा वापर केला आहे. 178Tbps ची गती साध्य करण्यासाठी संशोधकांच्या पथकाने ऑप्टिकल फायबरमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेव्हलेन्थच्या ऐवजी वाइडर रेंजचा वापर केला आहे. सध्या जास्तीत जास्त 9THz चा वापर केला जातो, परंतु हा वेग मिळविण्यासाठी तो जवळजवळ दुप्पट वापरला गेला आहे.