मुंबईतील ‘वसुली’च्या सिस्टीमबद्दल अधिकार्‍यानं दिली आमिर खानच्या ‘शो’मध्ये कबुली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह इतर पोलिसांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने यावर भाष्य केले आहे.

अभिनेता आमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी संजय पांडे दिसत आहेत. ते लाच कशाप्रकारे घेतली जाते आणि त्याचे वाटप कशाप्रकारे केले जाते त्यावर ते बोलत आहेत. आमिर खान प्रश्न विचारताना म्हणतोय, की पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल हे सामान्य लोक, रिक्षाचालक, फेरीवाले अशा लोकांकडून लाच घेताना अनेकदा दिसतात. पोलिसांचा पगार खूप कमी असल्याचे आपण बोलत असतो. पण लाच घेतात याचा अर्थ त्यांची कमाई चांगली असते.

त्यावर पांडे उत्तर देताना म्हणतात, जर हे लोकांकडून वसूल केलेले पैसे कुणा एका व्यक्तीकडे राहिले असते तर मी या गोष्टीवर सहमत असतो. पण हे पैसे एकच व्यक्ती घरी घेऊन जातो असे मला तरी वाटत नाही. वरिष्ठांची क्रमवारी असते. त्यावर आपले राजकारणी असतात. ही एक साखळी आहे आणि या साखळीत…’, असे ते म्हणाले.