लोणी काळभोर पोलिसांकडून 700 लिटर गावठी दारु जप्त

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथे एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 700 लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त केली असून एक सॅन्ट्रो कार ताब्यात घेण्यात आली आहे.

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावच्या हद्दीत हाॅटेल आनिशा गार्डन शेजारी जॉनी व्यंकट राठोड, ( वय 35 वर्षे), रा. शिंदवणे, काळे शिवार, ता. हवेली, जि. पुणे हा आपल्या सिल्व्हर रंगाची हयुंदाई कंपनीची सॅन्ट्रो कार नंबर एम एच 12 डी वाय 1087 कारमध्ये 35 लिटर मापाची एकुण 20 नग प्लॅस्टीक कॅन मध्ये 700 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारूची वाहतुक करीत असताना त्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी आपले सहकारी बाराते व पोलिस हवालदार गायकवाड यांनी त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडून एकुण 35 लिटरचे 20 कॅन मधील 700 लिटर गावठी दारु त्याची अंदाजे किंमत रु 35000 व हुंदाई सॅन्ट्रो कारची अंदाजे किंमत चार लाख असा एकुण चार लाख पस्तीस हजार रुपये इतका मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like