लोणी काळभोरमध्ये भरदिवसा घरफोडी, तब्बल साडे सात लाखाचा मुद्देमाल लंपास

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – घरात कोणीही नाही याचा फायदा घेऊन भर दिवसा फ्लॅटचा दरवाजा उचकटून तब्बल सात लाखांच्या वर मुद्देमालासह रोख रक्कम लांबवली असून लोणी काळभोर गावात मोठी खळबळ उडाली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर गावातील खोकलाई चौकात बी. बी. सराफ काॅम्प्लेक्स मधील फ्लॅट क्र.11 मध्ये राहणारे पंकज मारोती जाधव, हे हिंजवडी येथील एका साॅफ्टवेअर कंपनी मध्ये साॅफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात. त्यांच्या वडीलांनी सन 2011 मध्ये या काॅम्प्लेक्स मध्ये फ्लॅट घेतला होता. त्यामुळे तेथे राहण्यासाठी आहेत. चार दिवसापूर्वी त्यांची बहिण बाहेरगावी गेली होती. तसेच दोन दिवसापूर्वी त्यांची पत्नी पिंपरी येथे गेल्या होत्या.

काल दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी सासवड येथे चारचाकी वॅगनार गाडी दुरुस्ती साठी गेले. त्यांची आई मामाकडे त्याच काॅम्प्लेक्स मध्ये आराम करण्यासाठी गेली असता, साधारण तीन वाजण्याच्या सुमारास मामाच्या मुलाने फोन करुन सांगितले की, तुमच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा आहे. त्यावर पंकज जाधव हे ताबडतोब घरी पोहोचल्यावर त्याच्या घरातील सोन्या चांदीचे जवळपास 24 तोळ्याचे मौल्यवान दागिने यामध्ये पाटल्या, अंगठ्या, गंठण, कानातील रिंगा, टाॅप्स, झुंबे बांगड्या, माळ व रोख रक्कम रु. 35 हजार असा एकुण रु. 6 लाख 47 हजार असा ऐवज तर त्याच्या शेजारी राहणारे शहनवाज रफिक आतार याच्या घरातील 6 तोळे सोने चांदीचे मोल्यवान दागिणे असा रु. 1 लाख 24 हजार असा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहेत.

लोणी काळभोर परिसरात ही बातमी वार्यासारखी पसरली व एकच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळू लागली. विशेष म्हणजे या भागात सीसीटीवी कॅमेरे असताना हा प्रकार कसा घडला हे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोणी काळभोर पोलिस याची सखोल तपासणी करुन पुढील तपास करीत आहेत.

You might also like