लोणी काळभोर पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह 2 जिवंत काडतुसे जप्‍त

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या उरूळीदेवाची गावचे हददीत सासवड मार्गावरील हॉटेल सह्याद्रीमध्ये एका इसमाकडून एक गावठी पिस्तुल हस्तगत केले.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संशयीत इसम जेवणाकरीता बसला असुन त्याचे कंबरेला पिस्टल लावलेला दिसत आहे. अशी बातमी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना मिळाली त्यांनी याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना दिली यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिल्या नंतर पोलिस उपनिरीक्षक ननवरे, पो. हवा नितीन गायकवाड, समीर चमनशेख, पोलीस नाईक विलास प्रधान, परशुराम सांगळे पोलीस कॉन्स्टेबल सागर कडु, दिगंबर साळुंखे यांनी.

पंचासह मौजे उरूळीदेवाची गावचे हददीत हॉटेल सह्याद्री येथे छापा घातला त्यावेळी हॉटेल सह्याद्रीचे समोर मोकळया जागेत दक्षिण पुर्व कोपऱ्यात एक इसम संशयास्पदरित्या टेबलखुर्चीवर बसलेला दिसला त्यावेळी त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो त्याचे कंबरेचे डावे बाजुस हात लावुन पळुन जावु लागल्याने त्यास पोलीसांनी जागीच पकडुन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रणव भारत शिरसाट वय 19 वर्षे सध्या रा. मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे मुळ रा. लोणीस्टेशन आंग्रेवस्ती कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगीतले पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेच डावे बाजुस एक गावठी पिस्टल खोचलेला मिळुन आला सदर पिस्टलचे मॅगझीनची पाहणी केली असता त्यात दोन जिवंत काडतुस असल्याचे मिळुन आले आहे.

ही कारवाई संदिप पाटील (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), विवेक पाटील (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), सी भोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभा, वरीष्ट पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Visit :- policenama.com