अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

थेऊर, पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करुन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात ट्रकसह चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे याची अंदाजे किंमत सात लाख बत्तीस हजार एवढी आहे.

लोणी काळभोर चे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकुंद रणमोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका येथे आज बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अवैध रित्या वाळू वाहतूक करणारा एक ट्रक लोणी काळभोर पोलिसांनी अडवला व त्याच्याकडे वाळू वाहतूक संबंधित परवानगी संदर्भात विचारणा केली असता काहीच उपलब्ध नसल्याने ट्रक चालक रोहिदास नारायण बराते रा.वडगाव देवकर ता.दौंड यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अवैध धंदे व वाळू वाहतूक यावर कडक कारवाई करण्याची सक्त सुचना दिल्या असल्याने यावर कारवाई करण्यात येत आहे.पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर पुढील तपास करीत आहेत.

You might also like