लोणी काळभोर पोलिसांनी केली वाळू वाहनांवर कारवाई

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन –  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली यासंदर्भात वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडून लोणी काळभोर पोलिसांना कारवाईच्या सूचना आल्यावर या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी उरुळी कांचन दूरक्षेत्रातील परिसरात आपल्या सहकार्याच्या मदतीने कारवाई करत एकुण 27 लाख 14 हजाराचा माल जप्त केला.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिस नाईक एस एस चितारे यांनी यासंबंधी फिर्याद दिली त्यानुसार, पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ व उरुळी कांचन परिसरात काही वाहनातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस कार्यालयाला कळली यावर लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी उरुळी कांचन पोलिस मदत केंद्राचे पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार एम जे गायकवाड पोलिस नाईक एस.एस चितारे, एस व्हि पवार पोलिस शिपाई भोसले यांना सोबत घेऊन कोरेगाव मूळ गावच्या शिवारात इनामदार वस्तीजवळ एक टाटा कंपनीचा ट्रक तसेच उरुळी कांचन येथे अन्य चार ट्रक वाळूने भरलेले आढळले त्यावरील चालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्याकडे वाळू उत्खनन व वाहतूक संदर्भात कोणतीही परवानगी नव्हती.त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले परंतु एक चालक पळून गेला तसेच संबंधित वाहनाच्या मालकावरही गुन्हे दाखल करण्यात आले .या पाच वाहनात मिळून 19 ब्रास वाळू हस्तगत केली तसेच वाहतूक करणारी वाहने पाच असा एकुण रु.27 लाख 14 हजाराचा माल जप्त केला.

पूर्व हवेलीतील गावामध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा चालू आहे परंतु महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.मुळा मुठा नदीच्या काठावर नदीपात्रातील वाळू काढून अनेक वाहने रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.याकडेही संबंधित अधिकार्याने लक्ष देणे आवश्यक आहे विशेषतः उरुळी कांचन प्रयागधाम परिसरात ही वाळू धुऊन स्वच्छ केली जाते