Loni Kalbhor Pune Crime News | लोणी काळभोर: शाळेत सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार

Pune Crime News | Pune: A rickshaw driver, bitten a retired policeman's hand and broke his thumb
ADV

लोणी काळभोर : Loni Kalbhor Pune Crime News | लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसवले. त्यानंतर शाळेत सोडण्याऐवजी स्वतःच्या घरी नेऊन लैगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवार (दि.६) सकाळी १० ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) रिक्षा चालकावर पॉक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय वसंत जाधव Vijay Vasant Jadhav (वय-२४, रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता- हवेली, जि-पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जाते. दरम्यान, मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती.

तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक आरोपी विजय जाधव तेथे आला. व चल तुला शाळेला सोडवतो, असे म्हणाला. अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पिडीतेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे. असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. (Loni Kalbhor Pune Crime News)

त्यानंतर तिच्यासोबत लगट करून बळजबरी करू लागला.
तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करू लागला.
मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली.
तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह (Molestation Case) बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच, आरोपी विजय जाधव हा फरार झाला आहे.
पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांनी भेट दिली आहे.
याबाबतचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार (API Kishor Pawar) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MPSC Student Missing | मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; पुण्यात एमपीएससी करणारा तरुण तीन महिन्यांपासून ‘गायब’

Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली !
विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP

Total
0
Shares
Related Posts