पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Loni Kalbhor Pune Crime News | पाणी पिण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन (Chain Snatching) नेणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वडकी नाला येथील एका वेल्डींगच्या दुकानासमोर घडली आहे.
याबाबत भामाबाई शिवराम भोसले (वय-85 रा. वडकी नाला, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार अक्षय सोमनाथ चौधरी (वय-22 रा. पॅराडाइस सोसायटी, चिखली, पिंपरी चिंचवड), महादेव प्रकाश तिर्थे (वय-21 रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड) यांच्यावर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातु विकास याचे वडकी नाला येथे कानिफनाथ फॅब्रीकेशन नावाचे वेल्डींगचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्य़ादी दुकानासमोर बसल्या होत्या. त्यावेळी दोन जण दुचाकीवरुन आले. दुकानामध्ये कोणी नसल्याचे आणि फिर्यादी वयस्कर असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी पिण्यासाठी पाणी मागितले.
पाणी पिण्याच्या बहाणा करुन आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेली.
याबाबत फिर्य़ादी यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत. (Loni Kalbhor Pune Crime News)
मोबाईल चोरणारा गजाआड
हडपसर : फोन करण्याच्या बहाण्याने फोन घेऊन तरुणाला धक्का देऊन मोबाईल चोरून नेणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना मंगळवारी (दि.13) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रोडवर घडली आहे.
याबाबत आकाश मारुती पोपळे (वय-22 रा. सातवनगर, हांडेवाडी मूळ रा. मु.पो.वांगी खुर्द ता भुम)
यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम काळेनाथ भोसले (वय-19 रा.काळेपडळ)
याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक
Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)