चक्क किराणा दुकानात दारुची विक्री, लोणी काळभोर मधील घटना

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – लोणी काळभोर मधील मध्यवर्ती चौकात एका किराणा मालाच्या दुकानामध्ये देशी व विदेशी दारु विकली जात होती याचा सुगावा पोलिसांना लागला त्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करून एका इसमाला ताब्यात घेतले.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी येथील खोकलाई देवी चौकात भरगच्च वस्तीत अजय किराणा दुकान आहे तेथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना माहिती मिळाली त्यावर त्यांनी आपले सहकारी गायकवाड, गाले, बाराते व धावडे यांना याची कल्पना दिली त्यानंतर आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना याची माहिती दिली व त्यांचा मार्गदर्शनाखाली तेथे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

साधारण सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही पंचासह खोकलाई देवी चौकातील अजय किराणा दुकानावर अवैधरित्या दारू विक्री होताना आढळून आले तेथे दुकानाचा मालक अनिल याने मुख्य काउंटर खाली एका फ्रिजमध्ये वेगवेगळ्या १५ प्रकारच्या एकूण १७२ देशी व विदेशी दारू बाटल्या आढळून आल्या ज्याची बाजार भावाप्रमाणे किंमत रु.१५,१७२ इतकी आहे.याप्रकरणी दुकानाचा मालक अनिल तीलकचंद देसर्डा यास ताब्यात घेतले आहे.