लोणीकाळभोर : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चेतन कोटमळे (वय 27) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी याचे नातेवाईक शेजारी राहतात. दरम्यान आरोपी चेतन याने फिर्यादी यांच्या मुलीला टेरेसवर नेहून तिची छेड काढत तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केला आहे. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.