लोणीकाळभोर : दुकानातील 80 हजार रूपयांच्या बांगडया फोडल्याचा प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दुकानात ठेवण्यात आलेल्या 80 हजार रुपयांच्या बांगड्याच अज्ञाताने फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा पुणे पोलीस दलासह लोणी काळभोर परिसरात सुरू आहे. मध्यरात्री या बांगड्या फोडल्या आहेत.

याप्रकरणी शाहरुख मन्यार (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उरुळीकांचन येथे रहातात. दरम्यान त्यांचे बाजार तळ येथे दुकान आहे. ते हातातील बांगड्या विक्री करतात. दोन दिवसांपूर्वी (दि. 8) मध्यरात्री दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले होते. यादरम्यान त्यांनी 80 हजार रुपयांच्या बांगड्या या दुकानातील कॉटवर ठेवल्या होत्या. यावेळी अज्ञात मुद्दाम या सर्व बांगड्या फोडून टाकल्या आहेत. आता या बांगडया कोणी आणि का फोडल्या याचा तपास लोणी काळभोर पोलीस करणार आहेत.