ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने ‘तिरंगा’ सन्मान जनजागृती

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या आकारातील कागदी, प्लॅस्टिक व कापडाचे तिरंगी झेंडे वापरले जातात, पण नंतर ते कुठेही टाकुन दिले जातात. अशा प्रकारे तिरंगी झेंड्याचा अवमान होऊ नये म्हणून ग्रीन फाउंडेशनच्या वतीने हे सर्व झेंडे गोळा करून त्यांचा सन्मान राखण्याचे बहुमोल काम करण्यात आले.

ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ह्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. या संदर्भात ग्रीन फाउंडेशनने परिसरातील शाळा, महाविद्याल, गावांमध्ये, वाड्या-वस्तींवर जाऊन राष्ट्रध्वजाचा मान कशा प्रकारे राखला जाऊ शकतो या संदर्भात माहिती दिली होती.

सुभाष विरकर म्हणाले की राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. या मोहीमेत कागदी, प्लॉस्टिकचे ध्वज उचलण्याचे कार्य ग्रीन फाउंडेशनने केले. ग्रीन फाऊंडेशन समाजाभिमुख अनेक उपक्रम राबवते. आज गावांमधील शाळा, कॉलेज, आंगणवाडी, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले राष्ट्रध्वज उचलण्यात आले. या दिवशी लहान मुले, युवक मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वज घेऊन फिरतात व नकळत कुठेही विसरतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होऊ नये या यासाठी ग्रीन फाउंडेशन सलग तीन वर्ष हा उपक्रम राबवत आहे.

फाउंडेशनच्या सभासदांनी राष्ट्रध्वज उचलून त्याचा सन्मान राखण्याचे कार्य करत आहे. या वेळी अमित जगताप, किरण भास्कर, किरण मगर, अमिर सय्यद, निखील महाजन, संतोष सोनवणे, निखील चव्हाण, कृष्णा देठे, ओमकार महाजन, अभिषेक शेंडगे, सर्व सभासद उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –