लोणी काळभोर पोलिसांकडून गावठी कट्ट्यासह एकाला अटक

लोणी काळभोर : पोलिसनामा – पुणे सोलापूर महामार्गावर माळीमळा परिसरात लोणी काळभोर पोलिसांनी गावठी पिस्तुल सह एकास अटक केली.

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, यांनी ग्रामीण पोलिसांना कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना एका खात्रीशीर बातमीदाराने पुणे सोलापूर महामार्गावरील राजेंद्र पेट्रोलपंपाजवळ एक इसम गावठी पिस्तुल घेऊन येत असल्याची माहिती दिली.त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांना यावर ताबडतोब कारवाई करुन ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.

पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांनी त्यांच्यासोबत अभिमान कोळेकर, नितीन सुद्रीक, प्रमोद शिंदे,महेंद्र चांदणे, पाटसकर यांच्यासह माळीमळा येथे सापळा रचला.काही वेळाने तेथे एक व्यक्ती संशयीतपणे फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतुसे आढळून आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे नाव हनुमंत राजकुमार सुरवसे (रा.लोणी काळभोर माळीमळा) ता. हवेली असे सांगितले.

जप्त केलेल्या मालाची किंमत रु 25,400/- इतकी आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/