थेऊर आणि म्हातोबाची आळंदी परिसरात 2 मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील थेऊर व म्हातोबाची आंळदी परिसरात या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन आनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे दोन्हीही मृतदेह पुरुष जातीचे आहेत. लोणीकाळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर येथील मुळा मुठा नदीत एक आनोळखी मृतदेह पाण्यात वाहून आला. तो पुरूष जातीचा असून वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे आहे यासंदर्भात गावच्या पोलिस पाटील रेश्मा कांबळे यांनी लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली.

यावर लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह नदीपाञातून बाहेर काढून पोलिस पाटील यांच्या समक्ष पंचनामा केला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्या अंगावर निळा काळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॕन्ट तसेच उजव्या हातावर स्वास्तिक असलेला लाल दोरा आहे.

आळंदी (म्हातोबा) येथे पुरुष जातीचा अंदाजे पन्नास ते पंच्चावन्न वर्षे वय असलेला मृतदेह आढळून आला असून अंगामध्ये पायजमा शर्ट व उजव्या हातात पितळी धातूचे कडे आल्याची माहिती पोलिस पाटील सोनाली शिवरकर यानी पोलिसाना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन पुढील कार्यवाही साठी ससुन रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश कर्चे, सुनिल शिंदे करत आहेत.