लोणीकंद : ट्रक अपघातामध्ये सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

लोणीकंद : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद येथे पुणे नगर महामार्गलगत जगताप वस्ती जवळ एका सायकलस्वाराचा ट्रक धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सायकल स्वार (अंदाजे वय 40 वर्षे) पेरणे फाट्याकडून तुळापूर फाट्याकडे सायकल वर चाललेला असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (MH-12-NX-4283) जोराची धडक दिली अशी माहिती प्रतिदर्शीने सांगितले.

या अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला कळताच माहिती मिळतात लोणिकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. प्रथमदर्शनीने दिलेल्या माहितीनुसार सायकल स्वाराला उडवून ट्रक चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकास एक किलोमीटर पर्यंत पाठलाग करून नागरिकांनी पकडून त्या चालकांला पोलिसांना ताब्यात दिले. लोकांचे उग्र रूप धारण होण्याच्या अगोदरच याची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, पोलीस हवालदार निलेश महादेव शिंदे, श्रीमंत होनमाणे, चंद्रकांत माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.व त्या चालकांना ताब्यात घेतले व उपस्थित नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला गेला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like