नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – कमी किमतीत सोने विकत घेण्याच्या आमिषाला बळी पडून जवळपास 4 लाख 71 हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली होती या गुन्ह्यातील भामट्यास लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाळवाडी येथील अरुण दत्तात्रय आव्हाळे यांना स्वस्तास बनावट सोने विकून त्याची फसवणूक केल्याचा गुन्हा लोणीकंद पोलिसात दाखल करण्यात आला होता.यावर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस यावर त्वरीत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

गुन्हे शोध पथकास एक इसम आव्हाळवाडी परिसरात स्वस्तात सोने विकत असल्याची माहिती एका बातमीदाराकडून मिळाली यावर हे पथक तेथे पोहोचले व सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची कसून तपासणी व चौकशी केली असता त्याचे नाव गोविंद उर्फ मारुती रामनाथ आंधळे रा.आव्हाळवाडी ता. हवेली मूळ गाव लिंबोडी देवनिमगांव ता.आष्टी जि.बीड असे सांगितले. तर त्याच्याकडे सोन्याचे प्लाॅलीश केलेली दागीने आढळून आले.आव्हाळवाडी येथील 4 लाख 71 हजाराच्या फसवणूकीच्या गुन्ह्या संदर्भात पोलिसी खाक्या दाखवल्यावर कबुली दिली.या भामट्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाणे, पोलिस काॅन्स्टेबल संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाने, ॠषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.

पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी परिसरातील नागरिकांना विनंती केली आहे की आपण अशा भामट्याच्या फसवणुकीस बळी पडू नका हे नेहमीच नवनवीन शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करत असतात.