हाॅटेल साहित्य चोरी प्रकरणी तीघे जण अटकेत, लोणीकंद पोलिसांची कारवाई

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – एका हाॅटेल व्यावसायिकाने दुसर्या हाॅटेलमधील साहित्य पळवून आपला व्यवसाय थाटला या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन जनांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 66 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण लाॅकडाऊन असल्या कारणामुळे हाॅटेल त्रिवेणीचे चालक प्रसन्ना शंभू हेगडे हे आपल्या मूळ गावी गेले होते.ते दि.15 ऑक्टोबर रोजी पुन्हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी तुळापूर ता.हवेली येथे परतले.तेंव्हा तेथे कोणी अज्ञात व्यक्तीकडून त्याच्या हाॅटेलचे कुलूप व कोयंडा तोडून शटर उचकटून आतील सर्व स्वयंपाकाची भांडी फ्रिज डीप फ्रिज एल इ डी टीव्ही तसेच सी सी टी व्हीचा डी व्ही आर असे साहित्य चोरुन नेले याबद्दल त्यांनी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली.

लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथक या गुन्ह्याचा तपास करीत असता दि 22/10/2020 रोजी हे पथक फिर्यादीस सोबत घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल, लॉज, धाबे तपास करीत असताना पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पिंपरी सांडस गावचे हद्दीत अष्टापुर- उरुळी कांचन मार्गावर राजयोग नावाचे हॉटेल गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेले असून तेथे काही जुने वापरलेले हॉटेलचे साहित्य असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे दोन व्यक्ती टाटा कंपनीच्या टेम्पो मधून हॉटेलचे सामान उतरवित असताना दिसले. गुन्हे शोध पथकाने अचानकपणे छापा घातला असता तेथे चोरीस गेलेले सर्व सामान सापडले त्याची ओळख पटली. म्हणून त्या दोन जणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचे सामान हे मनोज कनिचे याचे सांगणे वरून तुळापूर येथील त्रिवेणी हॉटेल येथून घरफोडी करून चोरल्याची कबुली दिली यावर लोणीकंद येथून मनोज कनिचे यास सापळा रचून ताब्यात घेतले.

या गुन्ह्यात एकुण तीन व्यक्ती 1) मनोज रामभाऊ कनिचे वय 28 वर्षे, 2) राहुल रामभाऊ कनिचे वय 23 वर्षे, 3) विशाल मधुकर उंबरे वय 20 वर्षे, सर्व रा. तुळापूर, ता हवेली, जि पुणे यांना ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा टेम्पो क्र MH 12 KP 0271, कडी कोयंडा कुलूप तोडण्यासाठी लागणारे लोखंडी कटावनी असा एकूण 01,66,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील,हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर यांनी केली आहे.

You might also like