लोणीकंद पोलिसांकडून 2 सराईतांना अटक, 29 मोबाईल जप्त

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या गुन्ह्यात हवे असलेले दोन फरार दरोडेखोरांच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्यात यश आले असून ते पोलिस कोठडीत आहेत.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2019 मध्ये वाघोली येथे दरोडा पडला या संदर्भातील तक्रार लोणीकंद पोलिस स्टेशन मधे दाखल होती यातील दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकातील पोलिस हवालदार बाळासाहेब व पोलिस काॅन्स्टेबल ॠषीकेश व्यवहारे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील दोन दरोडेखोर लोणीकंद येथील हाॅटेल सप्तमी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यावर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दत्ता रंगनाथ गायकवाड जे जे नगर वाघोली व किशोर विश्वनाथ जाधव दुबे नगर वाघोली यांना ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे मान्य केले.त्याच्याकडून रु 1,54,000 किमतीचे 29 मोबाईल हस्तगत केले.

ही कारवाई हवेलीच्या विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलिस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाणे, पोलिस काॅन्स्टेबल संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाने, ॠषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.