सराईत घरफोड्या करणाऱ्या चोरटयाला लोणीकंद पोलिसांकडून अटक

वाघोली : प्रतिनिधी (कल्याण साबळे, पाटील) –   वाघोली (ता:हवेली) परिसरातील एका बांधकाम साईटवरील घराचा कडी कोयंडा तोडून त्या घरातील दोन मोबाईल व एक ब्लु टुथ सेट अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता या प्रकरणी लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल झाल्या नंतर वाघोली परिसरात राहणाऱ्या एका सराईत चोरट्यास लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दीपक छोटुराम दास (वय 21 वर्षे, रा.गाडे वस्ती, वाघोली,) हे काम करीत असलेल्या बांधकामाचे ठिकाणी त्यांना राहण्यासाठी बनवलेल्या खोलीत राहतात.रोज प्रमाणे कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील दोन मोबाईल व एक ब्लूटूथ असा एकूण 18,290 रु किंमतीचा माल चोरुन नेला अशी फिर्याद लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.लोणीकंदच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या तपास चक्रे सुरू केला.गुन्हे शाखेने लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सर्व आरोपीची तपासणी केली तेव्हा सुमन उर्फ शिवा शंभू चक्रवर्ती (वय 21 वर्षे, रा. आय व्ही इस्टेट लेबर कॅम्प, वाघोली) मूळ- कलकत्ता यास लोणीकंद पोलिसांनी शिथाफिन वाघोली येथे त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे या गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्याच्याकडे एक पल्सर गाडी व 03 मोबाईल व ब्लूटूथ असा एकूण 63,490 रु किंमतीचा मुद्देमाल सापडला. अधिक चौकशी केली असता त्याने गाडी व मोबाईल हे चोरीचे असल्याचे सांगितले. लोणीकंद पोलीस स्टेशन व पल्सर गाडीबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.त्याच्यावर यापूर्वी देखील लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता.

ही कारवाई हवेली उपविभागीय पोलीस अधिकारीसई भोरे पाटील,लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, संतोष मारकड, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली आहे.