दिवसा घरफोडी करणारा सराईत गजाआड लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलिसांनी भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12/10/2019 रोजी वाघोली येथील ॠषीराज काॅम्प्लेक्स येथे राहणारे अमोल चंद्रकांत तापकीर यांच्या बंद खोलीचे डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून त्याच्याकडील एच पी कंपनीचा 30,000/- रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घटनास्थळास भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी करून महत्वाचे सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले. त्यानुसार आरोपीचा शोध सुरु केला.

यादरम्यान दि. 18/10/2019 रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाघोली गाव येथे संचलन सुरु असताना केसनंद फाटा चौक वाघोली येथे वाहतूक कोंडीत या गुन्हयातील संशयित आरोपी दिसला. त्याचेजवळील निळ्या रंगाच्या बजाज पल्सर 200 वरुन जात असताना त्यास ऋषिकेश व्यवहारे यांनी ओळखून जागीच गाडीसह ताब्यात घेतले. त्यास लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रकाश उर्फ राहुल शामराव डुकळे वय 25 वर्षे, रा. भारत गॅस गोडाऊनजवळ, कवडे वस्ती, उबाळेनगर, वाघोली, पुणे असे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याच्या घरात ठेवलेले आणखी एक एच पी कंपनीचा लॅपटॉप, 2 मोबाईल, एक 16 इंच AOC कंपनीचा एल सी डी तसेच गुन्ह्यात वापरलेले पल्सर वाहन असे एकूण रु. 1,45,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याबाबत आरोपीने कबुली दिली आहे. आरोपीवर या अगोदर देखील वाळुंज पोलीस स्टेशन, सोलापूर येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई डॉ. सई भोरे पाटील (उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली), पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, विनोद माने यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जगताप हे करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी