शौर्यदिनानिमित्त 230 जणांना लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत बंदी

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – ( कल्याण साबळे पाटील) पेरणे ( ता: हवेली) येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातुन आठ ते दहा लाख समाज बांधव येत असतात. या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी लोणिकंद पोलीस स्टेशन हद्दीतील 229 हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याना परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांनी सांगितले आहे.

पेरणे ता. हवेली येथे एक जानेवारी रोजी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या आठ ते दहा लाख समाज बांधवाच्या सुरक्षेची त्याच बरोबर नियोजनाची जबाबदारी प्रशासनावर असते. परिसरात कायदा सुव्यवस्था राखणे कामी अनेकजण नियोजन करण्यासाठी मदत करत असतात. लोणिकंद पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ ( २ ) नुसार सत्तर ३७ जणांवर, ११० नुसार २० जणांवर तसेच कलम १४९ नुसार १०३ जणांवर तर १०७ नुसार ५५, मुबई ए क्त ९३प्रमाणे १५ जणांवर कारवाई कारवाई करण्यात आली असून एकूण २३० आज पर्यंत कारवाई करण्यात आली आहे

एकून २३० जणांवर प्रतीबंधक कार्यवाही नोटीस बजावण्यात आल्या असून परिसरात बंदी मनाई आदेश देण्यात आलेल्या व्यक्तींना ३० डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत परिसरात येण्यास बंदी घालण्यात आलेल्या आहेत. तर इतरही बहुतांश लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सई भोरे पाटील यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप पाटिल हे एक जानेवारीच्या पार्श्वभूमिवर दररोज परिसराची माहिती घेत असल्याचे सांगत नागरिकांनी व मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांनी सोशल मिडिया तसेच अफवा वर विश्वास ठेऊ नये असे आवाहन हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील व लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/