Lonikand Police | लोणीकंद पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील 3 महिन्यापासून फरार आरोपीला अटक

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन (Policenama Online) – खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला (accuse) लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अटक केली आहे. आरोपी गेल्या तीन महिन्यापासून फरार होता. लोणीकंद पोलीस (Lonikand Police) त्याच्या मागावर होते. अखेर त्याला वाघोली येथून अटक (Arrest) करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकरटीकरण विभागाने केली.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर संजय गायकवाड (वय-19 रा. गोरेवस्ती वाघोली) हा गेल्या तीन महिन्यापासून फरार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच घातक हत्यार बाळगून दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्याची नोंद आहे. गुन्हे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे (Suraj Gore) व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना किशोर गायकवाड हा वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ (Vagheshwar Temple) येणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वाघेश्वर मंदिराजवळ खाजगी वाहनाने पोहोचले व तेथे शोध घेतला असता तेथे सराईत किशोर गायकवाड आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) व पोलीस निरीक्षक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे (Police Sub Inspector Suraj Gore), दळवी, सहाय्यक फौजदार मोहन वाळके, पोलीस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंखे, विनायक साळवे, पोलीस अमलदार समीर पिलाने, सागर कडू, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.

Web Title :- Lonikand Police | Lonikanda police arrest fugitive accused for 3 months in attempted murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे