हिंगणगाव येथील युवकाकडून गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त

वाघोली : हिंगणगाव (ता. हवेली) येथील युवकाकडून बेकायदा गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जप्त केले असून रविवारी (दि.३१) केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास पिस्तुलासह लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अंकुश विठ्ठल मल्लाव (रा. हिंगणगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार हिंगणगाव येथील युवक अंकुश मल्लाव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीत त्याच्या कंबरेला असलेले गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, उमाकांत कुंजीर, प्रमोद नवले, विजय कांचन, गुरू जाधव, धीरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे अक्षय जावळे यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like