लोणीकंद पोलिसात एका ‘कोरोना’ रुग्णावर गुन्हा दाखल

वाघोली / प्रतिनिधी (कल्याण साबळे पाटील ):- प्रशासकीय नियम तोडून गावी आल्याची माहिती लपवली याप्रकरणी वाडेबोल्हाई (ता:हवेली) येथे ठाणे येथून येथे आलेल्या २९ वर्षीय तरुणाने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता प्रवास करणे तसेच गावी आल्याची माहिती प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेला देणे बंधनकारक असताना देखील ही माहिती दिली नसल्याने वाडेबोल्हाई येथील कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाडेबोल्हाईच्या पोलीस पाटील सुषमा चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, ठाणे येथून २९ वर्षीय तरुण त्याच्या पत्नीसह २५ मे रोजी वाडेबोल्हाई येथील एका वस्तीतील कुटुंबीयांकडे आला होता. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याने २६ मे रोजी वाघोली येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केली असता २७ मे रोजी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यास तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ठाणे येथून वाडेबोल्हाईत येत असताना कोणतीही प्रवासाची शासकीय परवानगी घेतली नव्हती तसेच वाडेबोल्हाई ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राला वाडेबोल्हाई मध्ये दाखल झाल्याची माहिती देणे बंधनकारक असताना देखील माहिती दिली नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही गावांमध्ये बाहेरील व्यक्ती आल्यास किंवा कोणाला जिल्हा बाहेर जायचे असल्यास प्रशासनाला कडून परवानगी घेणे गरजेनुसार आहे. स्थानिक प्रशासन,आरोग्य विभाग यांना देखील माहिती देणे गरजेचे आहे. तसेच स्वतःहून 14 दिवस क्वारांटाईन होणे गरजेचे आहे. कोणाला काही लक्षण आढळल्यास तात्काळ स्थानिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेल्या व्यक्तीची घरमालक किंव्हा त्या भाडेकरूने माहिती लपवली व त्यामुळे संसर्ग रोगाचा प्रसार झाला तर त्यांच्यावर शासनाचे नियमाचा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रताप मानकर (पोलिस निरीक्षक लोणिकंद )