लोणीकंद पोलिसांकडून जबरी चोरी करणार्‍या सराईताला अटक

शिक्रापुर : पुणे शहराजवळील वाघोली गावचे हद्दीत चोखीदाणी रोडवर संतोष चंद्रकांत तांबे ( वय 40वर्षे, रा. मोहपाडा, खालापूर, रायगड ) यांना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून अज्ञात इसमांनी दुचाकी वरून येऊन काही अंतर रिक्षामधून पुढे नेवून तोंडावर फाईट मारून खाली जमिनीवर आदळून जखमी करून खिशातील एक विवो कंपनीचा मोबाईल व रोख 4000 रुपये असा एकूण 14,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे. याबाबत लोणिकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना योगेश भंडारे यांच्या तांत्रिक कौशल्याने व गुप्त बातमीच्या आधारे एका संशयित इसमाची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे आदेशाने बातमी मिळाले ठिकाणी रवाना होवून कडा आष्टी, बीड, मुर्शत पूर, जामखेड, खर्डा या परिसरात कसून शोध घेतला असता एका संशयित इसमास बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, योगेश भंडारे यांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रामा अर्जुन मुरकुटे( वय 26 वर्षे, रा. धनवडे वस्ती, ता. आष्टी, जि. बीड )असे सांगितले. सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे कडून गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH12SN6718 व 04 मोबाईल असा एकूण 90,000रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रामा मुरकुटे हा अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी शिक्रापूर, बेलवंडी पोलीस ठाणे येथे चोरी व जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे या करीत आहेत.

सदर कामगिरी मा.डॉ. अभिनव देशमुख सो (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. विवेक पाटील सो (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), मा.डॉ. सई भोरे पाटील मॅडम (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग), श्री. प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) या वरिष्ठांच्या मार्ग दर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षा जगदाळे, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, योगेश भंडारे यांनी केली आहे.