लोणीकंद पोलिसांनी कोलवडीत केली हातभट्टीवर कारवाई

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या काळात अवैध धंद्यांचा समूळ नष्ट करण्यासाठी लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करुन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक आपल्या हद्दीत गस्त घालत असताना कोलवडी- साष्टे गावचे हद्दीत बापू रिकामे यांचे शेताजवळ, मुळा मुठा नदीच्या काठावर रिकामे वस्ती, कोलवडी-साष्टे ता हवेली येथे दोन इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची बातमी मिळाल्याने पथकाने या ठिकाणी जाऊन छापा घातला असता तेथे राजू दादासाहेब केकान वय 29, व अविनाश विलास ससाणे वय 27, रा. साष्टे गायरान, ता हवेली जि पुणे हे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना सापडले घटनास्थळी 2000 लीटर कच्चे रसायन (तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित), चार कॅनमध्ये एकूण 140 लिटर तयार दारू, तसेच अल्युमिनिअमची चाटू, ताटली, लाकडाचा ढीग असा एकूण रु. 57,700 चा माल जप्त केला.या दोन व्यक्तीवर लोणीकंद पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे केसनंद गावचे हद्दीत लोणीकंद-केसनंद रोडवरील शिवशाही हॉटेल जवळ असलेल्या काटवणात अवैध दारू विक्री करणारा विष्णू मारुती कांबळे वय 29 , रा केसनंद यास ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ख ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर यांनी लोणीकंद पो स्टे चे डी बी पथक- पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, देवेंद्र बेंद्रे, ऋषिकेश व्यवहारे यांनी केली आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like